
सूर्योदय भारत समाचार सेवा : फुर्रचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये हनी सिंह आणि कपिल शर्मा यांना फुल पंजाबी स्टाईलमध्ये पाहण्याची उत्सुकता वाढली होती. आता अखेर हे प्रतिक्षित गाणं रिलीज झालं आहे. दोघांची छान जुळलेली एनर्जी आणि मस्ती डान्स फ्लोअरवर एक ताजीतवानी वाइब घेऊन येते.
भलंमोठं स्टेडियम, रंगीबेरंगी डिस्को लाईट्स आणि ‘करंट लागल्यासारखी’ इलेक्ट्रिक वाइब—फुर्र या सगळ्याचा एक सॉलिड पार्टी पंच देतं. हनी सिंह आणि जोश ब्रार यांनी गायलंय, म्युझिक हनी सिंहचं, आणि राज ब्रार यांच्या बोलांनी पूर्ण गाण्याला कडक पंजाबी झिंग दिलीय. बीट असा की कानात पडताच अंगात ताल धावतो.
गाण्याबद्दल बोलताना हनी सिंह म्हणाला, “कपिल माझा अगदी जिगरी आहे, आणि त्याच्या किस किसको प्यार करूँ 2 साठी गाणं करणं म्हणजे धमालच! फुर्र हा एकदम पार्टी बॉम्ब—असा ग्रूव्ह की डान्स फ्लोअरवर गेले की बाहेर पडावंसं वाटणारच नाही! तर चला, सगळे मिळून फुर्र करत करत थिएटरमध्ये पोचूया!”
‘किस किसको प्यार करूं २’ हा एक उत्तम शादी-कॉमेडी असल्याचे आश्वासन देतो, ज्यामध्ये कपिलचे पात्र आता बहुसांस्कृतिक वैवाहिक गोंधळात अडकले आहे!
अनुकल्प गोस्वामी दिग्दर्शित, ‘किस किसको प्यार करूं २’ हा चित्रपट रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास-मस्तान यांनी व्हीनस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट अंतर्गत आणि अब्बास मस्तान फिल्म प्रॉडक्शनच्या सहकार्याने तयार केला आहे. या वर्षातील हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.
Suryoday Bharat Suryoday Bharat